भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातील वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, भारताचे दिवंगत राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतात वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो..भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या आमच्या तमाम वृत्तपत्र विक्रेता बांधवांना शुभेच्छा..
उन, पाऊस आणि थंडीची जराही पर्वा न करता, आपण साखर झोपेत असताना वृत्तपत्र विक्रेते न्यूज पेपर आपल्या घरी पोहोचते करतात.. अत्यंत कठीण असे हे काम हॉकर्स गेली कित्येक वर्षे नित्यनियमाने करीत असले तरी ना समाजानं त्यांना कधी सहानुभूती दाखविली ना सरकारने त्यांच्या बुनियादी मागण्यांची दखल घेतली.. सुदैवानं असंघटीत असा हा वर्ग आता बळकट संघटनेच्या माध्यमातून संघटीत होऊन आपल्या हक्कासाठी, न्याय्य मागण्यासाठी आवाज उठविताना दिसतो आहे.. मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सर्व शक्तीनिशी आमच्या या मित्रांच्या बरोबर आहे..