शासकीय सहभागाने उद्या रायगडावर साजऱ्या होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 335 व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे तयारी पूर्ण झाली असून जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्यासह जिल्हयातील विविध अधिकाऱ्यांनी काल तयारीची पाहणी केली.या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या शिवभक्तांची संख्या लक्षात घेऊन गडावर जिल्हा परिषदेच्यावतीने चोवीस ठिक ाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कऱण्यात आली आहे.चार ठिकाणी आरोग्य पथकं कार्यरत ठेवण्यात येत आहेत.गडावर चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येत आहेत.काल गडावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली,त्यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा जमा कऱण्यात आला.