किल्ले रायगडावर आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.काल रात्रीपासूनच हजारो शिवसैनिक किल्ले रायगडावर जमा झाले होते.पहाटे 4 वाजता शिवाजी वाळण येथील तरूणांनी शिवरायंाच्या गडावरील पुतळ्यास अभिवादन करून सकाळी पाचाड-कोझर मार्गे महाड शहरातून शिवज्योतीची मिरवणूक काढली.त्यानंतर शङरातील शिवरायांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले.हजारो शिवप्रमींच्या जय शिवाजी ,जय भवानीच्या गजरांनी आज रायगड आणि परिसर दणाणून गेला होता.
आज अलिबाग येथेही शिवजयंती निमित्त नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.तसेच नंदूरबार येथील शिवप्रमी चंद्रशेखर बेहेरे यांनी कुलाबा किल्लयातून प्रज्वलीत केलेली शिवज्योत घेऊन नंदूरबारकडे प्रय़ान केले.यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.