शैक्षणिक सहलींवर निर्बन्ध आणणारे परिपत्रक काढणारे रामचंद्र जाधव यांच्यावर चोहोबाजुंनी टीका सुरू झाल्यानंतर त्यानी आता समुद्र किनारे,नद्या आणि टेकडीवरील सहलींना बंदी घालण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची तयारी दाखविली आहे.या संदर्भात पालक,विद्यार्थी,शिक्षणसंस्था आणि शिक्षण प्रेमीशीं चर्चा करण्यासाठी लवकरच आपण सर्वसंबंधितांची बैठक बोलाविणार असल्याचे त्यांनी आज रात्री माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.जाधव यांनी जे परिपत्रक काढले ते काढताना कश्याचाही विचार केला गेला नसल्याने अनेक कलमांवर पुनर्विचार करण्याची त्यांनी तयारी दाखविली आहे.-