महाराष्ट्र सरकारच्य माहिती आणि जनसंपर्क महासंचालयनालयातर्फे दिल्या जात असलेल्या ( हे पुरस्कार 1910 पासून दिलेच गेले नाहीत ) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारास प्रतिसाद न मिळाल्याने महासचालनालयालावर प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढवली आहे.यापूर्वीच्या पत्रकानुसार पत्रकारांकडून 31 मार्चपर्यत प्रवेशिका मागविण्यात आलेल्या होत्या मात्र स्पर्धेसाठी फारच कमी पत्रकारांनी प्रवेशिका पाठविल्याने आणि काही विभागातून तर एखादी-दुसरीच प्रवेशिका आल्याने प्रेवेशिका पाठवायला मुदतवाढ द्यावी लागली आहे.आता 30 एप्रिलपर्यत या प्रवेशिका पाठविता येतील.असे माहिती विभागाने पत्रकाव्दारे कळविले आहे.
पत्रकारांना राज्य सरकारतर्फे जे पुरस्कार दिले जातात त्या पुरस्कारांच्या रक्कमा खरोखरच चांगल्या आहेत पण अनेक पत्रकाराना प्रवेशिका पाठवून पुरस्कार घेणे कमीपणाचे वाटते,त्यामुळे प्रवेशिकाच येत नाहीत.त्यामुळे पुरस्कार निवडीची प्रक्रिया बदलावी अशी मागणी होत असतानाही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.शिवाय आलेल्या चार-दहा प्रवेशिकामधून निवड केल्यानंतरही पुरस्कारोचे वितरण केलेच जात नाही.आमच्या माहिती प्रमाणे 2010 पासूनचे पुरस्कार अजून दिले गेले नाहीत. त्यामुळे पुरस्कार मिळाल्याचा निखळ आनंदही पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांना उपभोगता येत नाही हा सारा उधारीचा मामला असल्याते लक्षात आल्यानेच पत्रकारांनी आता या पुरस्कार योजनेकडेच पाठ फिरविली आहे. अन्य विभागाचे पुरस्कार ठरलेल्या वेळेत दिले जातात ,केवळ माहिती आणि जनसंपर्क विभागच त्याला अपवाद आहे.पत्रकारांच्या कोणत्याही विषयाकडे गांभीर्य़ाने पहायचेच नाही अशी माहिती आणि जनसंपर्क विभागातील काही अधिकाऱ्यांची मानसिकता आहे.सरकारही अशा अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहे,आतातरी अधिकारी याचा गांभीर्याने विचार करतील आणि दरवर्षी किमान 6 जानेवारीला हे पुरस्कार वितरित होतील यादृष्टीने नियोजन केले जाईल अशी अपेक्षा आहे.