मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सांडभोर यांच्या नावाने चळवळीत काम करणार्या पत्रकारांना शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार देण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतला आहे.काल शशिकांत सांडभोर यांच्या श्रध्दांजली सभेत बोलताना एस.एम.देशमुख यांनी ही माहिती दिली.हा पुरस्कार केवळ मुंबईतील पत्रकारांसाठीच असेल.या आणि परिषदेच्या अन्य पुरस्कारांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.शशिकांत सांडभोर यांचं मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला सातत्यानं सहकार्य लाभलेलं आहे.कायदा आणि पन्शनसाठीच्या चळवळीतही शशिकांत यांचे मोलाचे सहकार्य होते.एक चळवळ्या पत्रकार असलेल्या शशिकांतचा मुंबईतील अन्य पत्रकार संघटनांशी देखील संबंध होता.त्यामुळं शशिकांच्या कार्याची प्रेरणा तरूण पत्रकारांना मिळत राहावी यासाठी हा पुरस्कार असल्याचे परिषदेच्यावतीने सांगण्यात आले आहे.रोख रक्कम,शाळ ,श्रीफळ आणि स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे..