राजगुरूनगर ः ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सांडभोर यांच्यावर आज सकाळी त्यांच्या खेड तालुक्यातील वेताळे गावी अंतिम संस्कार करण्यात आले.शशिला शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव भीमा नदीच्या तिरावर एकवटला होता.शशिकांत सांडभोर यांचे काल दुपारी 4 वाजता मुंबईत निधन झाले.त्यांचे पार्थिव सकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या मुळ वेताळे गावी आणले गेले.सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाने त्यांच्या चितेस अग्नि दिला.यावेळी अनेकांना शोक आवरला नाही.यावेळी मराठी पत्रकार परिषेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख,पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य सुभाष भारव्दाज,पुणे शहर पत्रकार संघाचे सचिव सुनील वाळुंज,तसेच राजगुरूनगर येथील पत्रकार राजेंद्र सांडभोर,अन्य पत्रकार,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.–