…
श्रीरामपुर ः आपल्या संयमीपणाबद्दल प्रसिध्द असलेल्या श्री.शरद पवार यांच्या संयमाचा बांध श्रीरामपुरात आज एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नामुळे तुटला आणि ते चक्क पत्रकार परिषद सोडून जायला निघाले..मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद सुरू ठेवली.
राष्ट्रवादी कॉग्रेस सोडून अनेक नेते भाजप किंवा शिवसेनेत जात आहेत.यावरून एका पत्रकाराने आपले नातेवाईक देखील आपल्याला सोडून जात आहेत हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यावर शरद पवार चांगलेच भडकले आणि त्यांनी पत्रकाराला फैलावर घेतले.ते म्हणाले,’येथे नातेवाईकांचा संबंध काय ? राजकारणात अनेकजण काम करीत असतात,प्रत्येकाच्या राजकीय भूमिका भिन्न असू शकतात तेव्हा ‘तुमच्या कुटुंबातील’ असा उल्लेख करणे पोरकटपणाचे आहे.असे सांगूनच पवार थांबले नाहीत तर पत्रकाराला तुम्ही माफी मागा अशी सूचनाही त्यांनी केली.अशा लोकांना बोलवत जावू नका नाही तर मला बोलावू नका असा संतापही त्यांनी व्यक्त केला.आपण बाहेर गेले तर बरे होईल अशी विनंती देखील त्यांनी नंतर पत्रकाराला केली.या नाट्यामुळं पत्रकार परिषदेत चांगलीच अस्वस्थतः निर्माण झाली होती.
राष्ट्रवादी पक्ष रिकामा होत आहे यामुळं शरद पवार किती अस्वस्थ आहेत याचे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया श्रीरामपुरात व्यक्त होत होती.इटीव्ही भारतने हे वृत्त दिले आहे.