मुंबईःराष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची एक मुलाखत न्यूज 18 लोकमतवर मागच्या आठवड्यात प्रक्षेपित झाली.न्यूज 18 लोकमतचे समुह संपादक डॉ.उदय निरगुडकर यांनी ती मुलाखत घेतली होती.मुलाखत दोन भागात होती.पहिला विषय होता किल्लारी भूकंपाशी संबंधित.दुसरा चालू घडामोडींवरचा होता.मुलाखतीत राफेल खरेदी व्यवहारावर काही प्रश्‍न विचारले गेले.त्याला श्री .शरद पवार यांनी आपल्या शैलीत उत्तरं दिली.शरद पवार यांनी मुलाखतीत जी मतं व्यक्त केली त्यावर  प्रतिक्रिया सुरू झाल्या.

मुलाखत प्रक्षेपित झाल्यानंतर स्वाभाविकपणे प्रत्येकजण आपल्या पध्दतीनं त्याचं विश्‍लेषण करू लागला.त्यावर अग्रलेखही आले.इंग्रजी दैनिकांनी हा विषय कव्हर केला.इंग्रजी वाहिन्यांवरही चर्चा झाल्या.देशभर  गदरोळ उठल्यानं सारे राष्ट्रवादी अस्वस्थ झाले.त्यातूनच तारीक अन्वर यांचा राजीनामा आला.हा राजीनामा आल्यानंतर पक्षातील अस्वस्थतः अधिकच वाढली.त्यानंतर शरद पवार यांनी बीडच्या सभेत ‘आपण नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिली नसल्याचं जाहीर केलं’ .मात्र मुलाखत दाखविली गेल्यानंतर जवळपास आठ दिवसांनी स्वतः शरद पवार यांनी हा खुलासा केला होता.न्यूज 18 लोकमतनं दाखविलेली मुलाखत काटछाट करून दाखविली असं पवारसाहेब बोलले नाहीत.जे विश्‍लेषण आलं त्या अनुषंगानं त्यांचा खुलासा होता.त्यांचा हा खुलासा डॅमेज कंट्रोलचा भाग होता असंही नंतर काही राजकीय विश्‍लेषकाचं म्हणणं होतं.एवढं सारं झाल्यानंतर आणि तारीक अन्वर यांचा राजीनामा झाल्यानंतर त्याचं खापर कोणाच्या तरी माथी फोडणं आवश्यक होतं.मिडिया हा त्यासाठी सॉफ्ट टार्गेट असतो.मी असं बोललोच नाही,मला असं म्हणायचंच नव्हतं..माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला,माझी मतं काटछाट करून दाखविली गेली असं बोलून मिडियालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं कऱण्याची किमया अनेक राजकारण्यांनी साध्य केलेली आहे.

शरद पवार यांच्या मुलाखतीमुळं राष्ट्रवादीची अडचण झाल्यानं मग न्यूज 18 लोकमतचे संपादक उदय निरगुडकर यांच्यावर त्याचं खापर फोडलंं जाऊ लागलं.शरद पवार जे बोलले त्याला उदय निरगुडकर जबाबदार आहेत असं समजून चॅनलवर अघोषित बहिष्कार टाकावा अशा सूचना दिल्या गेल्या.अर्थात अशा बहिष्कारानं काही फरक पडत नाही.कारण कोणतंही चॅनल केवळ विशिष्ट पक्षाचेच कार्यकर्ते पाहतात असं नाही.सामांन्य जनता ते पहात असते.अमुक चॅनल पहा किंवा अमुक पाहू नका असं फर्मान एखाद्या राजकीय पक्षाने काढल्यानं ते कोणी बघण्याचं थांबवत नाही.शिवाय हा बहिष्कार आता निवडणुकाजवळ आल्यानं राष्ट्रवादीला परवडणारा नाही.निवडणुक काळात चॅनल पेक्षा राजकीय मंडळींनाच चॅनलची जास्त गरज असते.दोन दिवस बातमी दिसली नाही तर मंडळी अस्वस्थ होते.त्यामुळं त्यानं फरक पडत नाही.माध्यमावर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न हा काही पहिल्यांदाच झालेला नाही.यापुर्वी देखील अन्य चॅनलस  आणि वृत्तपत्रांच्या बाबतीत झालेला आहे.तो यशस्वी झालेला नाही.

विषय संपादकांच्या नोकरीचा असेल तर त्याची काळजी फारशी कोणी करीत नाही.जॉईन होत असतानाच संपादकाला याची कल्पना असते की,कोणत्याही क्षणी आपल्याला बाहेर पडावे लागेल.स्वतः उदय निरगुडकर असतील,निखिल वागळे असतील,एस.एम.देशमुख असतील यांनी हा अनुभव घेतलेला आहे.राजकीय नेत्यांशी पंगा घेतल्यानं अनेक संपादकाच्या  नोकर्‍या गेलेल्या आहेत..अलिकडंचं उदाहरण पुण्यप्रसून वाजपेयी यांचंही देता येईल.मात्र नोकरी जाईल या भितीनं कोणताही हाडाचा संपादक वास्तव मांडण्याचं थांबवत नाही.हे वास्तवही ‘तुमची नोकरी घालवू म्हणून’  संपादकांना किंवा पत्रकारांना उठसुठ धमक्या देणार्‍यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

मुद्दा बहिष्काराचाही नाही.मुद्दा वेगळाच आहे.’चुकीची बातमी चालविल्याबद्दल उदय निरगुडकर यांनी शरद पवार यांची माफी मागितली’ अशा पोस्ट व्हायरल केल्या जाऊ लागल्या आहेत.संपादकांना बदनाम करण्याचा हा फंडा..राष्ट्रवादीच्या काही  नेत्यांनी आपल्या फेसबुक वॉलवरून  त्या फॉरवर्ड कऱण्याचा किंवा इतरांना टॅग करण्याचा सपाटा लावला आहे . लेखी माफी मागितली असं ठोकून सांगितलं जात आहे.यातलं सत्य जाणून घेण्यासाठी उद्याच्या बातमीदारनं उदय निरगुडकर यांच्याशी संपर्क साधला.त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं..’मी शेंगा खाल्लया नाहीत मी टरफलं उचलणार नाही..म्हणजे मी काही चूक केलेली नाही त्यामुळं मला माफी मागण्याचं काही कारण नाही’.एवढंच नव्हे तर शरद पवार यांच्याबद्दल मला कालही आदर होता ,आज ही आहे आणि उद्या ही असेल .. तरीही ते जे बोलले ते बोलले .. त्यामुळं त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता..ते जे बोलले ते जसंच्या तसं दाखविलं गेलं असल्यानं दिलगीरी व्यक्त करण्याचा प्रश्‍नच नाही असंही त्यांनी सांगितलं.निरगुडकर पुढे म्हणतात,मुलाखत प्रसिध्द झाल्यानंतर प्रत्येकानं आपल्यापरिनं त्याचे अर्थ आणि अन्वयार्थ लावले.त्याच्याशी माझा संबंध नाही.एवढंच नव्हे तर मुलाखत दिल्यानंतर ‘तुमच्या मुलाखती आवडतात,मी त्या नियमित बघतो’ असं प्रमाणपत्र देखील उदय निरगुडकर यांना शरद पवारांनी दिलं.मुलाखत संपल्यानंतर शरद पवार यांनी खास आग्रह करून उदय निरगुडकर यांना आपल्याबरोबर जेवण्याचाही आग्रह केला असं प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलं.याचा अर्थ सरळ आहे की,उदय निरगुडकर यांनी शरद पवार यांची माफी मागितलेली नाही.तसं कारणही नाही.तशी सूचनाही निरगुडकरांना शरद पवार यांनी केल्याचं ऐकिवात नाही..यासंबंधीच्या पोस्ट केवळ माध्यमांना खोटं ठरविण्याच्या काही राजकारणयांच्या प्रयत्नांचा एक भाग आहेत हे स्पष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here