केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून वाद पेटला असून त्याला हिंसक वळण लागले आहे.यामध्ये आज 4 पत्रकारांना चांगलाच प्रसाद मिळाला.हिंसाचाराचं चित्रिकरण करणार्या दोघा पत्रकारांना जबर मारहाण केली गेली.द न्यूज मिनिट आणि रिपब्लिकन टीव्हीचे हे दोन पत्रकार होते.या मारहाणीत दोन्ही पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत.
द न्यूज मिनिटने दिलेल्या वृत्तानुसार त्यांची पत्रकार शबरीमला मंदिरात भक्तांना घेऊन राज्य परिवहनच्या बसमधून प्रवास करीत होती.त्यावेळी वीस जणांच्या जमावाने बसवर हल्ला करत रिपोर्टरला खाली खेचले.महिला पत्रकाराशी वाद घालत त्यांना मारहाण केली गेली.जमावातील एका व्यक्तीनं महिला पत्रकाराला लाथ मारल्याचंही सांगितलं जातं.तिला मागून लाथ मारली जात असताना जमाव त्याचे चित्रिकरण करीत होता.एका महिलने पत्रकारावर पाण्याची बाटली देखील भिरकावली.दुसर्या घटनेत रिपब्लिकन टीव्हीच्या पत्रकार पूजा प्रसन्ना यांच्यावर हल्ला केला.त्यांच्या गाडीची तोडफोड केली.
शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिलेले आहेत.