व्हॉटस अॅपवरून पसरविल्या जाणार्या अफवांना लगाम घालण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथील जिल्हा प्रशासनाने व्हॉटस अॅप ग्रुपविरोधात कठोर भूमिका घेतली असून या व्हॉटस अॅपच्या अॅडमिन्सनी दहा दिवासता राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान केंद्रात या ग्रुपची नोंदणी करावी अशी ताकीद जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.नोंदणी न करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.अफवा आणि खोटया बातम्यांना लगाम लावण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
किश्तवाड पोलीस अधीक्षक अबरार चौधरी यांनी जिल्हाधिकार्यांना एक अहवाल पाठविला असून त्यात अफवा पसरविण्यासाठी व्हॉटस अॅपचा वापर होत असल्याचे म्हटले आहे.या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी अंग्रेजसिंह राणा यांनी ग्रुपची नोंदणी कऱण्याचे आदेश दिले आहेत.ग्रुपवरील मेसेजला ते स्वतः जबाबदार असतील,याचं उल्लंघन केल्यास आट टी अॅक्ट आणि भारतीय दंड विधानातील कलमांतर्गत करावाईचा सामना करावा लागेल असेही स्पष्ट कऱण्यात आलं आहे.
किश्तवाडमधील हा प्रयोग यशस्वी झाल्यास अऩ्यत्रही हे तंत्र वापरले जाऊ शकते अशी भिती आता व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्रातही गेल्या काही दिवासात मुलं पळविणार्या टोळीबाबतच्या अफवा व्हायरल झालेल्या आहेत.त्यावरून धुळ्यात पाच जणांची जमावाने हत्त्या केली आहे.मालेगाव आणि अन्यत्रही काही निष्पाप लोकांना मारहाण झाली आहे.या घटनांचे निमित्त करून महाराष्ट्रातही ग्रुप नोंदणीची सक्ती होणारच नाही याची शाश्वती देता येणार नाही.जम्मू-काश्मीरमधील स्थिती भिन्न असली तरी हा आजारा पेक्षा इलाज जालिम असा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.नोंदणीची कटकट करण्यापेक्षा अनेकजण आपला ग्रुप बंद करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.-