सकाळने आज एक चांगली बातमी दिली आहे.काल व्हिसल ब्लोअर्स विधेयक संसदेत मंजूर झाले आहे.त्यातील तरतुदींची माहिती अद्याप हाती आलेली नसली तरी आज सकाळने दिलेल्या बातमीन्वये या विधेयकात पत्रकारांनाही सरक्षण देण्यात आले आहे.सकाळच्या बातमीत म्हटले आहे, तक्रारकर्त्या कार्यकर्त्यांसह पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना तीन वर्षे कारावास आणि पन्नास हजार रूपये शिक्षेची तरतूद विधेयकात आहे.पत्रकारांना केंद्राच्या कायद्यान्वये संरक्षण मिळणार आहे.या कायद्यातील तरतुदींचा आता जास्तीत जास्त प्रचार व्हायला हवा.भ्रष्टाचार विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा कायदा होत आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही कें र्दीय कायदा मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा केला होता.आता महाराष्ट्रात सरकारने पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी आपली मागणी कायम आहे.