Five G आले आहे.. त्यावर आधारित मोजो हे तंत्रज्ञान ही आलंय.. बहुतेक दैनिकांनी आपल्या पत्रकारांना मोजोचं ट़ेनिंग द्यायला सुरूवात केली आहे.. त्याचा थेट फटका व्हिडीओ जर्नालिस्ट यांना बसणार आहे..भविष्यात हा वर्गच नाहिसा होतो की काय अशी भिती निर्माण झालीय.. कारण नवीन तंत्रज्ञानामुळे फोटो शूट किंवा रेकॉर्डिंग पत्रकारच करू शकणार असल्याने फोटोग़ाफर किंवा फोटो जर्नालिस्टची गरजच उरणार नाही.. महाराष्ट्रात 250 ते 300 व्हिडीओ जर्नलिस्टच्षा नोकरीवर येत्या सहा महिन्यात गंडांतर येईल ही चिंतेची बाब असल्याचे मत एका माजी संपादकाने व्यक्त केलंय.. अगोदर प्रुफरिडर गेले, मग डीटीपी ऑपरेटर आता व्हिडीओ जर्नलिस्ट जाणार आणि पुढील काही वर्षात अॅंकर देखील असणार नाहीत.. त्यामुळे एखादे भाषिक चॅनल चालविण्यासाठी जेथे 200च्या आसपास लोक लागायचे आज ते काम केवळ 50 लोकांमध्ये व्हायला लागलंय..नवीन तंत्रज्ञान अपरिहार्य असल्यानं त्याच स्वागत असले तरी ज्यांच्या नोकरयांवर गंडांतर येऊ घातले आहे त्यांना अन्यत्र सामावून घेणे गरजेचे आहे..त्यासाठी आता प़्यतन करावे लागतील..