ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांच्याभोवतीची वादाची मालिका संपण्याचं नाव घेत नाही. कारण हाफिज सईदशी घेतलेल्या भेटीनंतर आता वैदिक काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादात सापडले आहेत.
काश्मीरला स्वतंत्र करावं असं वादग्रस्त वक्तव्य वैदिक यांनी केलं आहे. 29 जून रोजी पाकिस्तानातील डॉन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वैदिक यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.भारतव्याप्त आणि पाकव्याप्त काश्मीरला मिळून स्वंतत्र करावं असा सल्ला त्यांनी या मुलाखतीवेळी दिला आहे. वैदिक पाकिस्तान दौऱ्यावर असतानाच्या काळात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या आधीच 26/11 चा आरोपी हाफिज सईदशी घेतलेल्या भेटीमुळे वैदिक वादात सापडलेत आहेत त्यानंतर आता या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
देशातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. आता या वादाला काय वळण लागणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.