वृत्तपत्र विक्रेत्यास लाथा बुक्यांनी मारहाण

0
1902


नांदेड जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेता बांधवांना विनंती करण्यात येते की, लोहा येथील वृत्तपत्र विक्रेते व जिल्हा ग्रामीण वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कोषाध्यक्ष पांडुरंग रहाटकर यांना काल दिनांक 26 एप्रिल 2019 रोजी लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सोनु संगेवार यांनी पेपर चे काम करत असतांना कोणतेही कारण नसतांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंद करण्यात आली आहे. नगरपालिकेसाठी मंजूर झालेल्या पाच कोटी रुपयांचा धनादेश विषयी माहिती व्हाॅटसअँपवर पोस्ट केली होती. रहाटकर यांची कोणतीही चूक नसताना केवळ वरील विषयाची पोस्ट केली म्हणून सन्मानाने काम करून जाणारया व सर्व जगाची माहिती सर्वांना पोहचवणार्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबीच केली आहे तेंव्हा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना व नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या तर्फे राज्य सरचिटणीस मा. बालाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा मा. जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन जाहीर तिव्र निषेध करण्यात येणार आहे.
तेंव्हा नांदेड जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेता पदाधिकारी, पत्रकार बांधव व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व मिडिया तील सर्व घटक व सदस्य बांधवांनी दिनांक 29 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहावे, हि नम्र विनंती.
आपले
गणेश वडगावकर ( जिल्हा उपाध्यक्ष )
बाबू जल्देवार ( जिल्हा कोषाध्यक्ष )
प्रशांत वाघमारे ( जिल्हाध्यक्ष ग्रामीण )
सुदर्शन कर्हाळे ( जिल्हा सचिव ग्रामीण )
सर्व पदाधिकारी ( शहर व ग्रामीण )
नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना
सलग्न-
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here