माध्यमांशी निगडीत प्रत्येक घटकावर दहशत बसविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे अशी शंका घेता येईल अशी परिस्थिती आहे.शुक्रवारची पंढरपुरातील घटना त्याला पुष्टी देणारी आहे.शुक्रवारी गोरख भिलारे हे वृत्तपत्र विक्रेते नेहमी प्रमाणे आपल्या स्टॉलवर बसले होते.तेथे आरोपी राजेंद्र भिंगे आला आणि फुकट पेपर वाचायला मागू लागला.त्यातून भिंगारे आणि भिंगे यांच्यात बाचाबाची झाली.याचे पर्यावसान नंतर भिंगारे यांच्यावर जीवघेण्या हल्ल्यात झाले.या घटनेनं पंढरपूरमधील वृत्तपत्रांशी निगडीत सारेच घटक अस्वस्थ झाले.एकत्र येत त्यानी उपविभागीय अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना आरोपीवर कठोर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे.यावेळी विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.वर्तमानपत्रं वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या साखळीतील वृत्तपत्र विक्रेता हा महत्वाचा घटक आहे.बारा महिने, वातावरणातील बदलाची पर्वा न करता सकाळी सकाळी हा पोर्या ताजी वर्तमानपत्रे आपल्या घरी पोहच करीत असतो.विक्रेत्यांनी हे काम थांबविले तर लोकांना वर्तमानपत्रे मिळू शकणार नाहीत.कोणत्याही मालकाला पर्यायी यंत्रणा उभी करता येणे शक्य नाही हे अनेकांनी करून पाहिलेले सत्य आहे.अशा या महत्वाच्या घटकावर हल्ले करून दहशत बसविण्याचा प्रयत्न होत असेल तर मराठी पत्रकार परिषद नक्कीच वृत्तपत्र विक्रेता संघटनेबरोबर आहे.पंढरपुरातील घटनेचा मराठी पत्रकार परिषदे तीव्र शब्दात धिक्कार करीत असून जिल्हा पोलीसअ अधीक्षकांनी यात लक्ष घालून आरोपीवर कारवाईची मागणी करीत आहे.पंढरपुरातील सर्व पत्रकारांनाही धन्वयाद दिले पाहिजेत.वृत्तपत्र विक्रेता आपलाच आहे या जाणिवेतून ही मंडळी भिंगारे यांच्या पाठिशी उभी राहिली आहे.यापुढील काळात ही एकजूट अधिक भक्कम करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील.वृत्तपत्र विक्रेते यापुढे एकटे नाहीत परिषदेची ताकद त्यांच्या समवेत असणार आहे.–