मुंबई प्रेस क्लबचा रेड इंक जीवनगौरव पुरस्कार विनोद दुवा यांना जाहीर
मुंबई, दि. 04 – मुंबई प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारा रेड इंक जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांना जाहीर झाला आहे. याशिवाय इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य संपादक राज कमल झा यांना जर्नालिस्ट ऑफ द ईयर’ हा रेड इंक पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील ’एनसीपीए’ येथे बुधवारी, 7 जून रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
वृत्तवाहिनीच्या माध्यमातून चर्चात्मक कार्यक्रम करणारे दुवा हे पहिलेच पत्रकार. शिवाय निवडणुकीबाबतच्या जनमत चाचण्या, निवडणूक निकालांचे सखोल विश्लेषण यातील त्यांची कामगिरी. वृत्तनिवेदनाची त्यांची सहज व ओघवती शैली याचा विचार करता त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.तर, राज कमल झा यांचे शोध पत्रकारीतेतील काम उल्लेखनीय आहे. ’पनामा पेपर’ प्रकरण उघडकीस आणण्यात इंडियन एक्सप्रेसचा महत्त्वाची कामगिरी बजावल्याच्या पार्श्वभूमीवर झा यांना हापुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.