” विधानसभेत जाण्यात रस नाही”

0
890

नसे प्रमुख राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवतील काय ?  या प्रश्नाचं उत्तर” नक्कीच नाही”  असंच आहे.त्याची काही कारणं आहेत.स्वबळावर राज ठाकरे यांचा पक्ष सत्तेवर येणं असंभव आहे.भाजपबरोबर म्हणा किंवा अन्य कोणाबरोबर जरी राज ठाकरे यांनी युती केली तरी युतीतला ” तो”  मोठा पक्ष राज ठाकरेंना मुख्यमंत्री कऱणार नाही हे नक्की. याचा सरळ अ र्थ एवढाच की,राज ठाकरे निवडणुकीला उभे राहिले, जिंकलेे तरी त्यांना  सभागृहात केवळ आमदार म्हणूनच बसावं लागेल हे उघड आहे. राज ठाकरेंची किंग मेकर ही भूमिका आणि त्यांचा एकूणच स्वभाव बघता 288 आमदारांपैकी एक  आमदार म्हणून वावरण्यात किंवा सभागृहात जाऊन बसण्यात त्यांना स्वारस्य असणं शक्यच नाही. ते त्यांच्या प्रकृत्ताली मानवणारंही नाही, आणि  ते त्यांच्या पत आणि प्रतिष्ठेलाही मारक ठरणार हे नक्की.राज ठाकरेंना याची पूर्ण कल्पना असावी.  म्हणूनच त्यांनी प्रवीण दरेकर लिखित राजगर्जना या पुस्तकाचे प्रकाशन करताना “आपणास विधानसभेत जाण्यात रस नसल्याचं”  स्पष्ट केलेलं आहे.”एकीकडं आपण मुख्य़मंत्रीपदाचे दावेदार आहोत असं जाहीर करायचं आणि दुसरीकडं आपणास विधानसभेत जाण्यात रस नसल्याचं वक्तव्य  करायचं”  हा त्यांच्या भूमिकेतला विरोधाभास अनेकांना बुचकळ्यात टाकणारा आहे.परंतू या दोन्ही गोष्टी शक्य कशा करता येतील यासाठी राज यांचा  प्रयत्न असणार आहे.म्हणजे राज ठाकरेंना मुख्यमंत्री तर नक्कीच व्हायचंय पण त्यांना निवडणूकही लढवायच्या भानगडीत पडायचं नाही.त्यांच्या पक्षाला बहुमत मिळालं,किंवा युतीतील कोणाला त्यांची ” दया”  आली आणि त्यांनी राज ठाकरेंना मुख्यंत्री करण्याची तयारी दर्शविली तर ते मुख्यमंत्री होतील.मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात मात्र ते निवडणूक लढवतील आणि विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य होतील.राज ठाकरेंच्या डोक्यात हेच गणित आहे. म त्र सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती बघ ता त्यांचे हे मनसुबे साध्य होण्याची सूतराम शक्यता नाही.त्यामुळं विधानसभेत जाऊन सातव्या-आठव्या-पंधराव्या रांगेत ते बसणं पसंत करतील असं म्हणता येणार नाही.ते विधानसभा लढविणार  नाहीत याचं अनुमान त्यांच्या आणखी एका वक्तव्यावरून काढता येईल.राज ठाकरे यांनी स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केल्यापासून त्यांना अनेकांनी,अनेकवेळा “तुमचा मत दार संघ कोणता”  असा प्रश्न विचारला आहे.ते तो जाहीर करीत नाहीत.राज ठाकरे यांच्यासारख्या वलयांकित नेतृ्रत्वाला आपला मत दार संघ गुप्त ठेवण्याचं कोणतंच कारण नाही.” राज ठाकरे कोठूनही उभे राहिले तरी ते सहज विजयी होतील”  असं किमान त्यांच्या पक्षाचे पुढारी तरी सांगतात. हा आत्मविश्वास राज ठाकरेंसह पक्षातील साऱ्यांनाच असेल तर त्यांनी मत दार संघ जाहीर कऱण्यात कोणतीच अडचण नसावी.पण ते मत दार संघ जाहीर करीत नाहीत.  याचं कारण त्यांना विजयाबद्दल भिती आहे असं नाही तर त्याचं कारण राज ठाकरे निवडणूक लढविण्याबद्दल गंभीर नाहीत हे आहे.दरेकरांच्या पुस्तकाचं प्रकाशन करतानाही त्यांनी हेच दाखवून दिलंय.महाराष्ट्र हाच माझा मत दार संघ असल्याचं त्यांनी  म्हटलंय.जो नेता मुख्यमंत्री व्हायला नि घाला आहे तो एवढ्या ढोबळपणानं वक्तव्य करू शकत नाही.मी महाराष्ट्राचा,महाराष्ट्र माझा अशी भावनिक भाषणबाजी वेगळी आणि निवडणुकीचं राजकारण वेगळं असतं.हे राजकारण पारंगत राज ठाकरेंना कोणी सांगण्याची गरज नसेल  तर त्याचं महाराष्ट्रच माझा मत दार संघ हे वक्तव्य ते गंभीर नसल्याचं निदर्शक आहे.राज ठाकरेमहाराष्ट्रात  ज्यांची नक्कल करायला नि घाले आहेत त्या नरेंद्र मोदी यांनीही अगोदर मत दार संघ नक्की केला होता.शिवाय भारत हाच माझा मत दार संघ आहे असं वक्तव्यही त्यांनी केलेलं नव्हतं.कारण ते स्वतः निवडणूक लढविण्यासाठी गंभीर होते .आपण निवडून येणार आणि देशाचं नेर्तृत्वही करणार याबद्दल त्यांच्या मनात आत्मविश्वास ठामपणे भरलेला होता.त्यामुळं संसंदेत जाण्यात मला रस नाही असं विधानही त्यांनी केलेलं नव्हतं.राज ठाकरे मात्र आजच अशी भाषा बोलायला लागले आहेत.याचा अ र्थ त्यांना राज्यातील राजकीय परिस्थितीचं आकलन झालेलं आहे असा काढता येईल.

– लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेची बुरीहालत झाली.सर्वच्या सर्व उमेदवारांच्या अनामत जप्त झाल्या.या पराभवानं पक्ष कार्यकर्त्यांच्या मनावर नैराश्यचं मळभ दाटून येणं स्वाभाविक होतं.या नैराश्येतून कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी सेनापतीनंचं मैदानात उतरण्याची द्वाही फिरविणे गरजेचं असतं.राज ठाकरेंनी ते केलं.पण राज्यात त्याचा खोलवर  परिणाम झाला असं दिसलेलं नाही.उलट त्यांच्या या घोषणेची खासगीत टिंगलच झाली.अनेकांनी त्यांची तुलना पंतप्रधान होण्यासाठी घोड्यावर बसलेल्या अरविंद केजरीवाल यांच्याशी केली.त्यात चुकीचंही असं काही नव्हतं किंवा नाही.जो पक्ष राज्याच्या एका टापूतच आपलं अस्तित्व ठेऊन आहे आणि ज्या टापूत अस्तित्व आहे तेथेही पक्षाच्या सर्व उमेदवाराची डिपॉझिट जप्त झाली असतील तर अशा पक्षाच्या नेत्यानं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नं बघ णं योग्य आहे काय ? असं अनेकांना वाटतं.राजकारणात काहीच अशक्य नाही हे जरी सत्य मानलं तरी परिस्थिती मनसेला आज अजिबात अनुकूल नाही याकडं दुर्लक्ष करता येणार नाही.महाराष्ट्रात मोदी लाट किमान विधानसभा होईपर्यत तरी ओसरण्याची  चिन्हं  नाहीत.या लाटेत मनसेचा निभाव लागेल असं वाटत नाही.राज ठाकरेंची मदार आहे ती,भाजप आणि शिवसेनेत भांडण लागतील  आणि त्याचा लाभ आपल्याला उठविता येईल या गृहितकावर . शिवसेनेबरोबरची युती भाजपनं तोडली तर आपल्याला भाजपबरोबर घरोबा करता येईल  असे त्यांचे आडाखे असू शकतात..मात्र अशा जर तरच्या गोष्टी राजकारणात निरर्थक ठरतात.शिवाय राज ठाकरे यांना वाटते म्हणून भाजप शिवसेनेबरोबरची युती तोडण्याची अजिबात शक्यता नाही.कुठपर्यत ताणायचं हे दोन्ही बाजुंना चांगलं ठाऊक असल्यानं तुटेपर्यत कोणीच ताणणार नाही हे नक्की.केंद्रात शिवसेनेला एकच मंत्रीपद दिलं गेलं.जे खातं दिलं ते ही अगदीच सामांन्य.त्यानं शिवसेना जरूर नाराज झाली पण सेनेनं टोकाची भूमिका घेतली नाही. छरिस्थिती ओळखून सेनेने अवमान गिळणंच पसंत केलं. कारण आज भाजपला शिवसेनेची किमान केंद्रात तरी गरज नाही.भाजपकडं स्वबळावर सरकार चालविण्याइतपत सदस्य बळ असल्यानं त्यांना सेनेला किंवा अन्य मित्र पक्षाला फ़ार गोंंजारण्याचं कारण वाटत नाही..महाराष्ट्रात दोघांनाही परस्परांची गरज आहे.शिवसेना राज्यात सर्वदूर पोहोचलेला पक्ष आहे.गावागावात पक्षाच्या शाखा आहेत.नेटवर्क आहे.भाजपला हे माहित आहे.त्यामुळंच काहीही झालं तरी भाजप निवडणुकीत शिवसेनेला डावलून मनसेबरोबर युती करेल असं वाटणंही राजकारणाबद्दल अनभिज्ञता व्यक्त करण्यासारखं आहे..जागा वाटपाच्या वेळेस भांडणे होतील,रूसवे-फुगेवेही होतील पण अंतिमतः  भाजप – सेना विधानसभेची लढाई एकत्रच लढतील हे नक्की.त्याचा लाभही या पक्षांना होईल.याचं कारण मोदींचा प्रभाव हे तर असणारच आहेच  शिवाय ऍन्टी इन्कंबंन्सीचा फायदाही युतीला होणार आहे.महाराष्ट्रातील जनता आघाडी सरकारच्या पंधरा वर्षाच्या भ्रष्ट्र आणि निष्क्रिय कारभाराला पुरती विटली आहे.जनतेला बदल हवाय.हा बदल युतीच्या पारड्यात  मतं टाकूनच घडून येऊ शकतो हे न ओळखण्याइतपत जनता आता अज्ञानी राहिलेली नाही. त्यामुळं मत दार युतीचाच  पर्याय निडवतील.या प्रक्रियेत मनसेसारख्या  कोण्यापक्षानं  आडवे येण्याचा प्रयत्न केला तर जनता लोकसभेप्रमाणंच विधानसभेतही  त्यांना माफ कऱणार नाही. हे आजचे चित्र आहे.याचा अ र्थ राज ठाकरेंच्या पक्षानं मैदानातून पळ काढावा  असा नाही.पण आपल्या क्षमतेनुसार त्यांनी जागा लढविण्याची गरज आहे आणि त्या लढविताना ” आपण कोणा एका पक्षाला त्याची जागा दाखवून देण्यासाठी नव्हे तर राज्याचं भलं कऱण्यासाठी लढत आहोत”  असा विस्वासही मत दारांना द्यावा लागेल..नाशिकमध्ये राज ठाकरेंनी सांगण्यासारखं काहीच करून दाखविलेलं नाही.त्यामुळं ” महाराष्ट्राची सत्ता हाती द्या ,मी महाराष्ट्राला सुता सारखा सरळ करून दाखवितो”  ही भाषा आता चालणारी नाही.महाराष्ट्र सरळच आहे,त्याला काही झालेलं नाही महाराष्ट्राचं सत्ताकारण बिघडलं आहे.ते सरळ करण्यासाठी सक्षण पक्षाची गरज आहे. तेवढी क्षमता राज ठाकरे यांच्यापक्षाकडं नाही. नाशिकचा राजप्रयोग अपयशी ठरल्यानं राज्यात मनसे काही करू शकेल यावर जनतेचा आता विश्वसा उरलेला नाही. त्यामुळं राज ठाकरेंना आता हा विश्वास पुन्हा संपादन करावा लागेल..राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर झालेल्या विधानसभेत किंवा लोकसभेच्या वेळेस मतदारांनी त्यांच्या पदरात भरभरून मतदान टाकले.कारण तेव्हा जनतेला मनसेसमर्थ पर्याय होऊ शकेल असं वाटत होतं .कालांतराने नाशिकच्या ा अनुभवामुळे म्हणा किंवा वेगवेगळ्या आंदोलनातील धरसोडपणामुळे म्हणा लोकाना मनसेबद्दलचा पहिला विश्वास राहिला नाही.राज ठाकरेंच्या सभांना लोक आजही ग र्दी करतात हे जरी खरं असलं तरी ही गर्दीमतांमध्ये परिवर्तीत होत नाही हे लोकसभेच्या वेळेस दिसून आलंय.या पार्श्वभूमीवर मनसेला आपण कुठं चुकतो आहोत याचं कठोर आत्मपरिक्षण करावं लागेल.त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागतील.बदलत्या पिढीला सुतासारखं सरळ कऱण्याची भाषा आवडत नाही तिला विकासाची,रोजगार उपलब्ध करून देण्याची आश्वासक भाषा लागते.मोदींनी तरूण पिढीची गरज ओळखून ती भाषा प्रचारात वापरली.राम मंदिर,जम्मू काश्मीरचा विषय किंवा हिंदुत्व हे भाजपचे परंपरागत विषय मोदींनी भाषणातून तरी वर्ज्य केले.तरूण पिढीला भावेल.आवडेल अशी भाषाच त्यांनी वापरली.ती तरूण पिढीनं उचलून धरली. त्यातून मोदींचा विजय झाला. राज ठाकरेंची तीच ती भाषा आता चालणार नाही.लोकांच्या मानसिकतेतील हा बदल आणि एकूणच बदलते राजकारण राज ठाकरेंना विचारात घ्यावे लागेल.  त्यानुसार वाटचाल करावी लागेल.असं झालं नाही तर त्यांचे मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न कधीच प्रत्यक्षात येणार नाही.कदाचित त्यांनाही हे उमगलं असावं.विधानसभेत जाण्यात रस नाही हे वाक्य त्यातूनच आलं असावं.

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here