विदर्भातही ‘परिषद’ जोरात..

नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे
रविवारी जिल्हास्तरीय अधिवेशन

नागपूर ( प्रतिनिधी ) ः जिल्हयातील पत्रकारांनी एकत्र येत ,आपल्याला भेडसावणार्‍या प्रश्‍नांवर चर्चा करून त्यातून मार्ग शोधावा या हेतूने मराठी पत्रकार परिषदेने जिल्हास्तरीय अधिवेशनाचा उपक्रम महाराष्ट्रभर सुरू केलेला आहे.त्याचाच एक भाग म्हणून नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हास्तरीय अधिवेशन येत्या रविवारी म्हणजे 5 फे ब्रुवारी 2017 रोजी शांती मंगल कार्यालय रामटेक येथे संपन्न होत आहे.या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख असणार असून अधिवेशनाचे उद्दघाटन स्थानिक आमदार डी.मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून आ.सुनील बाबू केदार उपस्थित राहणार आहेत.परिषदेचे विभागीय सचिव हेमंत डोर्लीकर,,विभागीय माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी,विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत.माजी राज्यमंत्री राजेंद्रजी मुळीक हे स्वागताध्यक्ष आहेत.

एक दिवसीय अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्‍नावर चर्चा होणार असून पत्रकारांना मान्यवरांचे विचार ऐकण्यास मिळणार आहेत.खुले अधिवेशनात पत्रकारांनाही आपली मतं मांडता येणार आहेत.नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुका दर दोन वर्षांनी नियमित होत असतात ( इतर जिल्हा संघांनी आदर्श घ्यावा) यावर्षीही नुकत्याच निवडणुका झाल्या असून त्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी अनिल ठाकरे जाहीर करतील.नव्या पदाधिकार्‍यांचा एस.एम.देशमुख ,हेमंत डोर्लीकर यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.तसेच यावेळी जिल्हयातील ज्येष्ठ आणि पत्रकारितेत महत्वपूर्ण योगदान दिलेल्या पत्रकारांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप हिवरकर,कार्याध्यक्ष प्रदीप घुमडवार आणि सरचिटणीस योगेश कोरडे यांनी दिली आहे.रामटेक तालुका पत्रकार संघाने अधिवेशनाचे संयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
महाराष्ट्रातील अन्य भागाप्रमाणेच विदर्भात देखील मराठी पत्रकार परिषदेची चळवळ जोरदार सुरू आहे.परिषद आता विदर्भातील प्रत्येक जिल्हयात आणि तालुक्यात पोहोचली आहे.विदर्भातील अन्य जिल्हयात देखील जिल्हास्तरीय अधिवेशनं घेतली जाणार असल्याचे विभागीय सचिव हेमंत डोर्लीकर यांनी स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here