विदर्भातही परिषदेची घोडदौड
मराठी पत्रकार परिषदेने अधिकाराचे वितऱण करीत विभागीय सचिवांना विशेष अधिकार प्रदान केल्यामुळे विभागीय सचिव स्वतंत्रपणे आपल्या विभागात संघटन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.नागपूर विभागीय सचिव हेमंत डोर्लीकर यांनी खापरखेडा येथे विभागातील अध्यक्ष आणि पदाधिकार्यांची बैठक घेऊन नागपूर विभागात संघटन सशक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.सदर बैठकीस गडचिरोलीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश भांडेकर,नागपूर जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप हिवरकर, वर्धा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अनिल मेघे तसेच परिसरातील परिषदेशी सलग्न जिल्हा संघाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी हेमंत डोर्लीकर यांनी 3 जुलै रोजी नांदेड येथे होत असलेल्या परिषदेच्या तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्षांचा मेळावा यशस्वी कऱण्याचे आवाहन केले.विदर्भात परिषदेची चळवळ वेगाने फोफावत असल्याबद्दल परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी आनंद व्यक्त करीत हेमंत डोर्लिकर आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन केले आहे.