रायगड जिल्हयातील उरण हे गाव औद्योगिकदृष्टया जगाच्या नकाशावर असलं तरी या गावात पोहोचणं आजही मोठं दिव्य असतं.जेएनपीटी,ओएनजीसी सारखे मोठमोठे अनेक प्रकल्प उऱण पट्ट्यात आलेले असले आणि त्यामुळे शहराची मुळ संस्कृती पार बदलून गेली असली तरी शहराचा विकास मात्र झालेला नाही.पनवेलहून उरणला जाणं किंवा मुंबईहून उरणला जाणं हे आजही मोठं दिव्य असतं.जेएनपीटीची मोठ मोठी कंटेनर्स अहोरात्र वहात असतात.कंटेनरच्या लांबच लांब रागा अगदी मध्यरात्री देखील लागलेल्या असतात.क ंटेनरच्या या भाऊ गर्दीतून वाट शोधत उरण गाठणं मोठंच जिकीरीचं काम .पळस्पे ते जएनपीटी,किंवा कळंबोली ते जे़एनपीट अथवा वाशी ते उलवा मार्गे दररोज अक्षरशः हजारो कंटेनर जा ये करीत असतात.शिवाय अन्य मोठी वाहनं देखील असतातच.ही वाहतूक गेल्या दहा वर्षात हजार पटीनं वाढली पण रस्ते मात्र आहे तेच राहिले,त्यामुळे वाहतूक कोंडी उरणकरांसाठी आता बातमी राहिलेली नाही.ती नित्याची बाब झाली आहे.त्याकडं कोणाचं लक्ष नाही.स्थानिक पुढारी हे सारं निमूटपणे सहन करीत असतात कारण जेएनपीटी असेल,सिडको असेल किंवा अन्य कंपन्यांची मोठी कॉन्ट्रक पुढाऱ्यांकडेच असल्याने या महत्वाच्या विषयावर कोणीच बोलत नाही. बीआरटीच्या धर्तीवर कंटेनरसाठी एक स्वतंत्र मार्गाचीच गरज आहे.त्यांनी छोट्या गाड्यांच्या मार्गात येता कामा नये असं झालं तरच छोटी वाहनं व्यवस्थित चालू शकतील.मात्र त्यादॄ़ष्टीनं प्रय़त्न होताना दिसत नाहीत . अशा स्थितीत पनवेल ते उरण हा वीस-पंचवीस किलो मिटरचा प्रवासही नकोसा होतो.
जी अवस्था उरण मार्गाची तीच उरण शहरातील.औद्योगिकऱण झाल्यानंतर उरणला श्रीमंतीची झळाळी आलेली .नवश्रीमंतांचा एक मोठा वर्ग उऱणमध्ये तयार झाला.त्यामुळे बहुतेकांकडे चार चाकी गाड्या असतातच असतात.जेएनपीटी आणि अन्य प्रकल्प येण्याअगोदर मच्छीमारी आणि शेतीवर गुजराण करणारं उरण एक छाटसं गाव होतं.कोकणातील अन्य गावात जशी अरूंद रस्ते आहेत तसेच उरणमध्येही अरूंद रस्ते आहेत.गाडया वाढल्या,प्रकल्पांचा नको तेवढा भार उरणवर पडायला लागला,लोकसंख्याही वाढत गेली मात्र उरणमधील रस्ते जैसे थेच राहिले.त्यामुळे उरणमधून गाडी चालविणे,उरण पोलिस ठाणे,उरण कोर्ट,उरण तहसिल कार्यालयात जाणे ही गोष्ट तारेवरची कसरत करण्यासारखी असते.वाहतूक कोंडी हा शहरातला आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे हे मला काल पुन्हा एकदा जाणवले.उरण शहरावर गेली अनेक वर्षे भाजप-सेना युतीचे राज्य आहे.त्यांच्या काळात इमारती वाढल्या मात्र शहराचा विकास म्हणून काही झालाय असं उरणमध्ये दिसलंच नाही.म्हणजे सत्ता कोणाची आहे हे फारसं महत्वाचं नसतं तर राजकारणही किती लोकांच्या प्रश्नासंबंधी किती संवेदनशील आहेत ही गोष्ट फार महत्वाची असते.उरणमध्ये पैश्याची उब लागल्याने समाजाप्रतीच्या राजकारण्यांच्या संवेदना बोथठ झालेल्या दिसतात.कारण वाहतूक कोंडीचा प्रश्नही उरणच्या कारभाऱ्यांना सोडविता आलेला नाही हे प्रकर्षानं जाणवलं,
रायगडात असताना उरणला अनेकदा जाणं व्हायचं.गेल्या वर्षी देखील पत्रकार मित्र प्रवीण पुरोंच्या सत्काराच्या निमित्तानं जाणं झालं होतं.त्यानंतर काल पुन्हा उरणला गेलो.कंटेनरची रांग कापत,कोणत्याही दिशा दर्शक बोर्डाअभावी रस्ता शोधत उरला पोहोचायला तब्बल दीड तास लागला.मला कोर्टात साडेदहा वाजता पोहोचायचे होते.बरं तरी मी साडेआठलाच पनवेलहून निघालो होतो.2008 मध्ये प्रसिध्द झालेल्या एका वाचकांच्या पत्रावरून एकानं बदनामीचा खटला दाखल केला आहे.त्याची तारीख होती.ती झालीच नाही.आता किती चकरा माऱाव्या लागतील माहिती नाही.प्रत्येक वेळी मला अशा अग्निदिव्यातून जावं लागणार आहे.उरणची भूमी ही लढाऊ कार्यकत्यार्ंची भूमी आहे.1984ला सिडकोविरोधात आंदोलनात पाच शेतकरी हुतात्मा झाले होते.अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारा उरणकर आज बराच सहिष्णू झाल्याचं दिसून आलं.कदाचित तो अधिक तडजोडवादी म्हणा किंवा व्यवहारवादी झालाय असंही म्हणता येईल.हा सभोवतालच्या बदलाचा परिणाम असू शकतो.अशा वातावरणातही काही व्यक्ती,पत्रकार निष्ठेनं काम करताना दिसतात हा एकच आशेचा किरण म्हणावा लागेल.पत्रकारांशा बोलताना वाहतूक कोंडीचा विषय मी ,संतोष पवार,संतोष पेरणेंही काढला.राजकारणी काही करीत नसतील तर पत्रकारांनी हा विषय हाती घ्यावा अशीही सूचना ेकेली.आता पत्रकारांनी काही केले तरच यातून मार्ग निघेल अशी खात्री वाटते.अन्यथा मुंबईच्या जवळ असलेल्या उरणची अवस्था अंदमान सारखी झालेली आहेच त्यातून सुटका होण्याची शक्यता कमीच आहे.नितीन गडकरी यांनी उरणसाठी अनेक घोषणा केलेल्या आहेत.राजकारण्यांच्या या घोषणा प्रत्यक्षात येतील तेव्हा येतील तुर्तास मात्र उरणला कोणी वाली नाही हे नक्की .( एस.एम)