आद्य क्रंातिकारक वासुदेव बळवंत फडके याचं रायगड जिल्हयातील शिरढोण येथे साकारत असलेले संरक्षित स्मारक येत्या 15 ऑगस्ट पर्यत पुर्ण कऱण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या सूत्रांनी दिली.
शिरढोण गावात फडके यांचा 300 वर्षांपुर्वीचा वाडा आहे.त्या वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे.दहा वर्षांपूर्वी हा वाडा अधिसूचनेव्दारे पुरातत्व विभागाकडं हस्तांतरीत करण्यात आला होता.त्यानंतर पुरातत्व विभागाने वाड्याला संरक्षित स्थळ म्हणून जाहीर केले.मात्र वाडयाच्या भिंती कोसळत असल्याने हा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करावा अशी मागणी केली जात होती.अखेर ती मान्य झाली आणि या स्मारकासाठी राज्य सरकारने 1 कोटी 73 लाखांची तरतूद करून ती रक्कम पुरातत्व विभागाकडे हस्तांतरीत केली गेली.त्यानंतर काम सुरू झाले.आता हे काम पूर्ण होत आले आहे.ते 15 ऑगस्ट पुर्वी पूर्म होईल.या स्मारकात फडके कुटुंबियांकडे असलेल्या आद्यक्रांतिकारकांच्या वस्तु ठेवण्यात येतील.