नामदेव शिंदे रा. दर्जी बोरगाव ता. रेणापूर जि. लातूर प्रतिनिधी पुण्यनगरी
नामदेवच्या गावालगत आरजखेडा आणि दर्जी बोरगाव च्या मधून मांजरा नदी वाहते. या नदीतील वाळू पट्याचा मागील 3 वर्षांपासून लिलाव झालेला नाही. तरीही वाळू उपसा सुरु होता. नदी पात्रात सध्या पाणी आहे.
एक वर्षांपूर्वी साई आरजखेडा दरम्यान याच नदीत वाळूच्या ढिगाऱ्या खाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या वाळू उपशाचा फोटो काढायला नामदेव तिथे गेला आणि काही फोटो काढले देखील
याच रागातून वाळू उपसा करणाऱ्यानी नामदेव ला जबर मारहाण केली.
गुन्हा दाखल झाला आहे.
पण हे प्रकरण पहिले नाही लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात ही प्रकरणे घडतच आहेत. पत्रकार मार खातच आहे.
विनोद उगीले उदगीर, सतीश सरतापे किल्लारी, रफिक शिकलकर रेणापूर, माधव मिरजगावे वाढवना, उमाकांत पाटील नागलगाव
ही सगळी एकाच दैनिकाची माणसं
यांच्या मागे व्यवस्थापन उभे राहील की who is he अशी नेहमीची वाक्य ऐकवली जातील.
मला गावकरी चे कौतुक वाटते की ते उस्मानाबाद प्रकरणात ते आपल्या लोकांच्या पाठीशी उभे राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here