रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी जिल्हयातील वाळू माफियांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली असून त्यांनी काल उरणनजिक उलवे येथे टाकलेल्या धाडीत रेती माफियांकडून वापरली जाणारी 1 कोटी 75 लाखांची मशिनरी जप्त केल्याने बेकायदेशीर रेती उपसा कऱणार्यांचे धाबे दणाणले आहे.यावेळी एक हजार एक्कावन ब्रास वाळूसाठाही जप्त कऱण्यात आला आहे.संबंधितांवर योग्य ती कारवाई कऱण्यात येत आहे.रायगड जिल्हयात विविध ठिकाणी समुद्रातून बेकायदेशीर वाळू मोठ्या प्रमाणात काढली जात आहे.त्यावर नियंत्रण आणावे अशी मागणी जिल्हयात सातत्यानं कऱण्यात येत होती.जिल्हाधिकार्यांनी स्वतः घटनास्थळावर जाऊन धाडशी कारवाई केल्याने त्याचे जिल्हयात स्वागत कऱण्यात येत आहे.