अलिबाग.- अकरा महिन्यांपासून गावकीनं वाळित टाकलेल्या एका विधवा महिलेनं आत्महत्या केल्याने रायगड जिल्हयातील सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणांनी आता गंभीर वळण घेतले आहे.
रोहा तालुक्यातील खाजणी येथील मोहिनी तळेकर या महिलेला गावकीनं अकरा महिन्यांपूर्वी वाळित टाकले होते.याची तक्रार तिनं पोलिसात दिल्यानंतर तिला घरात घुसून मारहाण कऱण्यात आली होती.यामुळे मानसिक दडपणाखाली असलेल्या मोहिनी तळेकर यांच्यावर अलिबागच्या रूग्णालयात उपचारही सुरू होते.अशा मात्र तणाव असहय झाल्याने 18 नोव्हेंबर 2014 रोजी गावकीच्या जाचाला कंटाळून मोहिनी तळेकर यांनी विषारी औषध प्राषण करून आत्महत्या केल्याची तक्रार तळेकर यांचे बंधू रमेश धात्रत यानी रोहा पोलिसात केली आहे.या प्रकऱणी रोहा पोलिसांनी 16 पुरूष आणि 15 महिलावर गुन्हा नोंदविला आहे .मात्र प्रमुख आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
रायगड जिल्हयात गेल्या अकरा महिन्यात सामाजिक बहिष्काराच्या 35 घटना समोर आल्याने जिल्हयात चिंता व्यक्त केली जात आहे.