बदलते हवामान आणि अवेळी पडणाऱ्या पावसामुळे रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या वाल उत्पादनावर विपरित परिणाम झाला आङे.त्यामुळे वाल उत्पादनात मोठी घट होणार असल्याने कोकणातील शेतकरी चिंतेत आहे.
वाल पिकाच्या बाबतीत रायगड जिल्हा राज्यात पहिला आहे.अलिबाग,रोहा,माणगाव तालुक्यात वालाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. रायगड जिल्हयात प्रसिध्द असलेल्या पोपटीसाठी वालाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.मात्र सतत बदलणाऱ्या वातावरणाच्या आंबा पिकावर जसा परिणाम झालाय तसाच वाला पिकावरही परिणाम झालाय.त्यामुळे वाल पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होणार असल्याने वालाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.