पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीत आज काढण्यात आलेल्या अन्याय प्रतिकार यात्रेच्या वेळी पोलिस आणि जमाव यांच्या दरम्यान चकमक उडाल्याने त्यात 8 ते 10 पत्रकार जखमी झाले आहेत.8 पोलिस आणि 100वर लोकही जखमी झाले आहेत.अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या मुद्दावरून साधी- महंत आणि पोलिस यांच्यात झटपट उडाली होती.त्यात अनेक साधू जखमी झाले होते.त्याचा निषेध कऱण्यासाठी आज अन्याय प्रतिकार यात्रा काढण्यात आली होती.यावेळी काही तरूणांनी प्रक्षोभक घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार सुरू केला.त्यात पत्रकार आणि सामांन्य नागरिकही जखमी झाले आहेत.-