महाराष्ट्रातील पत्रकारांना अन्य राज्या प्रमाणे frontline Worker म्हणून म्हणून मान्यता मिळावी, पत्रकारांना लसीकरण प़ाधांन्याने केले जावे या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषद, जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ विविध पातळ्यावर जोरदार प्रयत्न करीत आहेत.. काल परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन पत्रकारांच्या प़श्नांवर चर्चा केली.. राज्यात 137 पत्रकार मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे अशी आगही मागणी केली..पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे अशी विनंती दिलीप वळसे पाटील यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली त्याबद्दल शरद पाबळे यांनी वळसे पाटलांचे आभार मानले..