प्रत्रकारांच्या आारोग्याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुका पत्रकार संघाने पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करावे या मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनानुसार आज शिरूर तालुका पत्रकार संंघ,पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि केईएमच्या वतीने शिरूर तालुक्यातील वढू येथे पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.या शिबिराचे उद्दघाटन मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस,एम.देशमुख यांच्या हस्ते कऱण्यात आलं.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अशोक पवार हे होते.प्रांरंभी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी साऱ्याचं स्वागत के लं. यावेळी बोलताना एसेम देशमुख यांनी प्रत्येक तालुका आणि शहरातील पत्रकारांनी अशा प्रकारच्या शिबिराचे आय़ोजन करावे अशी सूचना केली.या शिबिरात साठच्यावर पत्रकारांची सहकुटुंब तपासणी करण्यात गेली दोन वर्षे तालुका पत्रकार संघ पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करीत आहे