पुनर्वसन झालेलं गाव उजाड डोंगरावर होतं.. गावातील नागरिकांना सावली व्हावी म्हणून प्रभाकरराव कुलकर्णी यांनी पाच वर्षांपुर्वी घरासमोरच्या मैदानात वडाचं झाड लावलं.. त्याला स्वतःच्या हातानं पाणी घातलं, झाड जतन केलं.. मात्र झाड मोठं व्हायच्या आधीच तात्या सर्वांना सोडून गेले.. वडाच्या गर्द सावलीत गावकरी विसावलेले पाहण्याचं त्याचं स्वप्न अधुरंच राहिलं.. त्यांचे चिरंजीव, आदर्श शेतकरी कल्याण कुलकर्णी यांनी पुढं हे वडाचं झाड वाढवलं, जतन केलं, झाड मोठं झालं.. गावकरी सावलीला विसावा घेऊ लागले.. आता कल्याण कुलकर्णी यांनी झाडाभोवती छान चबुतरा उभारला आहे.. लोकांना विसावा घेण्यासाठी चांगलीच सोय झाली आहे.. बीड जिल्हयातील धुनकवाडकर आता कलयाणरावांना धन्यवाद देत आहेत .. वडिलांची स्वप्नपूर्ती आणि पर्यावरण संवर्धन असा दुहेरी योग यातून साधला गेलाय..
कल्याणराव Great…