अहमदनगर, दि. १८ – नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे लोकमत वृत्तपत्रांचे वाटप होऊ न देता अंकांचे गठ्ठे बळजबरी पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. येथील महिला तहसीलदार इंदिरा चौधरी यांच्यावर काल रात्री हल्ला झाला. गटविकास अधिकाऱ्यांनाही मारहाण झाल्याची चर्चा आहे.
पण याप्रकरणी काहीही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हल्ला का झाला याचे कारण समजलेले नाही. नाशिकहून आलेल्या एका इसमाने हा हल्ला केल्याचे समजते.
या घटनेचा वृत्तांत लोकमतने आज प्रसिद्ध केलेला आहे. हल्ल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळेच अंकांचे वितरण रोखल्याची चर्चा आहे. हल्ला होऊनही तहसीलदारांनी तक्रार का दिली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.