रायगड जिल्हयात रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या युनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीत सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमाारास झालेल्या स्फोटात 1 जण ठार आणि नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.सर्व जखमींना पनवेल येथील एका खासगी रूग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहेत.ऍसिटोफेना आणि नायट्रीड ऍसिडच्या मिक्सिंगचे काम सुरू असताना हा स्फोट झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.स्फोट एवढा शक्तीशाली होता की,कंपनीतील तावदानाच्या काचा तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांच्या अंगात खोलवर घुसल्या आहेत.स्फोट झाल्याची बातमी समजताच फॅक्टरी इन्स्पेक्टरने कंपनीला भेट दिली आहे.