रायगड जिल्हयातील रेवदंडा येथील आगरकोट किल्ल्याच्या झालेल्या दुरावस्थेचे छायांकन कऱण्यासाठी किल्ल्यात गेलेले पत्रकार महेंद्र खैरे यांना काल मारहाण करण्यात आली.याची तक्रार रेवदंडा पोलिसात करण्यात आली आहे.
. किल्ल्याला गेलेले तडे आणि किल्ल्यात वाढलेले जंगलाचे सांमा्रज्य याचे वृतांकन आणि फोटो घेण्यासाठी महेंद्र खैरे तेथे गेले असता त्यांच्यावर गुंडांनी हल्ला केला.त्यांच्याकडील कॅमेरा हिसकावून घेत त्याचीही मोडतोड करण्यात आली आहे.रेवदंडा किल्ल्यात अनेक गैरप्रकार सुरू असतात.प्रेमी युगुलांनाही त्रास दिला जातो अशा गुंडांनीच पत्रकारावर हल्ला केला असावा .खैरे यांनी तक्रार दिली असून .त्यानुसार भादविच्या कलम 457,323 आणि 506नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे