ही तर सरकारची “कृपा”
राहुरीतील वरिष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर आज हल्ला करण्यात आला.. ही सरकारची कृपा आहे असं आम्हाला वाटतं. कारण पत्रकार संरक्षण कायद्याचं विधेयक दिल्लीला पाठवून सरकार हातावर हात मारून बसलंय.. कायदा व्हावा अशी सरकारचीच इच्छा नाही.. सरकारनं वारंवार आश्वासनं देऊनही सरकारनं पत्रकारांच्या तोंडाला पानं पुसली आहेत.. कायदा होत नसल्यानं पत्रकारांवर होणारे हल्ले थांबण्याचं नाव घेत नाही..पत्रकारांचं संरक्षण हे देखील चौकीदारांचच काम आहे… पण चौकिदारांना याचा विसर पडलेला दिसतोय
भाऊसाहेब येवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषद निषेध करीत आहे..