राष्ट्रवादी कॉग्रेसचे चिंतन शिबिर मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस अलिबाग येथे होत असून या शिबिरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.वेध भविष्याचा असे या शिबिराचे नामाभिधान कऱण्यात आलं असून या शिबिरात भाजपबरोबरचे संबंध आणि त्यानुषंगाने उत्पन्न झालेल्या परिस्थितीवर चर्चा कऱण्यात येणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.अलिबाग येथील साई इन हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे चिंतन होणार आहे.