जळगावः नेत्यांना प्रश्‍न विचारलेले अजिबात आवडत नाही..हे परवा अमेरिकेचे राष्ठ्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवून दिले.विस्थापितांबद्दलचा प्रश्‍न विचारताच ते भडकले आणि प्रश्‍नकर्त्या पत्रकाराला अव्दातव्दा बोलले.तोच ‘आदर्श ‘डोळ्यासमोर ठेवत आपल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पत्रकारांवर भडकले.कारण अर्थातच अडचणीचा प्रश्‍न ..’माजी मंत्री एकनाथ खडसे याचं पुनर्वसन कधी करणार’? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारताच ..’आम्हाला आमचा चालवू द्या,तुम्ही नका आम्हाला सांगू’ अशा शब्दात त्यांनी प्रश्‍नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.दानवेंची ही कृती थेट ट्रम्प यांना साजेशीच होती.
पत्रकारांच्या प्रश्‍नाला पार्श्‍वभूमी होती सकाळी घडलेल्या एका घटनेची होती.रावसाहेब दानवे निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर रावेर,भुसावळ येथे दौरा केला.या दौर्‍यात भाजप कार्यकर्त्यांनी त्याना एकनाथ खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत आक्रमक भूमिका घेत दानवेंना जाब विचारला.एवढं सारं झाल्यानंतर पत्रकार प्रश्‍न विचारणारच हे ओघानीच आलं.अर्थात हा प्रश्‍न अडचणीचा असल्यानं दानवे भडकले.तरीही त्यांनी खडसेंवरील आरोप बेछुट आहेत,असा खुलासाही करायला ते विसरले नाहीत.मग त्यांचे पुनर्वसन कधी करणार या प्रश्‍नावर बचावात्मक पवित्रा घेत ते म्हणाले,काही प्रकरणे न्याय प्रविष्ठ आहेत त्याचा निर्णय लागल्यावर बघू असं मोघम उत्तर त्यांनी दिलं.यावेळी खडसे तेथे उपस्थित होते.त्याींनी फार काही मत व्यक्त न करता स्मित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here