मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांची आणि अनुषंगीक दुरूस्तीची कामे त्वरित पूर्ण करावीत, बस स्थानकांवर गणेश भक्तांसाठी सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज संबंधित यंत्रणांना दिले आहेत
दिवाकर रावते यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल ते रोहा दरम्यान महामार्गाची आज पाहणी करून अधिकार्यांना योग्य त्या सूचना केल्या.यावेळी परिवहन मंत्र्यांनी पळस्पे फाटा,भोगावती नदीचा पुल,रामवाडी बसस्थानक,वडखळ बस स्थानक,कोलाड,रोहा आदि ठिकाणी थांबून पाहणी केली..यावेळी परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.