रायगड वार्तापत्र

0
860
NEW DELHI, INDIA - FEBRUARY 25: Indian actor Nana Patekar during promotion of his upcoming film The Attacks of 26/11 at PVR Rivoli on February 25, 2013 in New Delhi, India. The Hindi crime-thriller film is based on the 2008 Mumbai attacks. (Photo by Manoj Verma/Hindustan Times via Getty Images)

रायगडमध्ये नऊ नगरपालिकांच्या निवडणुका 

 रायगड जिल्हयातील अलिबाग,पेण,रोहा,श्रीवर्धन,उरण,खालापूर,महाड,मुरूड आणि माथेरान अशा नऊ नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने या नगरपालिका हद्दीत आदर्श आचारसंहिता लागू केली गेली आहे.जिल्हयातील पनवेल नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्याने आणि कर्जत नगरपालिकेची मुदत अद्याप संपायची असल्याने तेथे निवडणुका होत नाहीत.उर्वरित नऊ नगरापालिकेत 27 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे.त्यादृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.रायगड जिल्हयातील राजकारणात कधी काळी परस्परांचे कट्टर शत्रू असलेले शेकाप आणि राष्ट्रवादी कॉग्रेस नगरपालिका निवडणुकीत एकत्र येत असून ते आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवत आहेत.दुसरीकडे भाजपने शिवसेना आणि कॉग्रेसशी जुळवून घेण्याची तयारी सुरू केली असल्याने राजकारणात काहीही घडू शकते याचे संकेत रायगडात मिळू लागले आहेत.जिल्हयात राष्ट्रावादीकडून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,शेकापकडून पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील,शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि कॉग्रेसकडून प्रदेश सरचिटणीस माणिक जगताप आपआपले किल्ले लढवत आहेत.सर्वच पक्षांंकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.मात्र परस्पर विरोधी पक्षांशी हातमिळविणी करण्याच्या राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांमुळे मोठया प्रमाणात बंडखोरी होणार असल्याचे चित्र आहे.दरम्यान नगराध्यक्षांची निवडणूक थेट होणार असल्याने ही लॉटरी कोणाला लागते याकडेही सर्वांचे लक्ष आहे.अलिबाग नगरपालिकेची सत्ता दीर्घकाळ शेकापच्या ताब्यात आहे.यंदाही शेकापने प्रशांत नाईक यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीरकरून आघाडी घेतली आहे.प्रशांत नाईक यांच्याविरोधात विरोधी पक्ष कोणाला मैदानात उतरवतो ते काही दिवसातच दिसेल.मात्र नगरपालिका निवडणुकांमुळे शहरी भागातील राजकारण ढवळून निघणार हे नक्की।शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नुकतीच रोहयात एक जाहीर सभा घेऊन आपल्या पक्षाच्या प्रचाराचा एकप्रकारे नारळच फोडला.
 यंदाच्या पावसाळ्यात रायगडमध्ये 70 जणांचे बळी 
 रायगड जिल्हयात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या 128 टक्के पाऊस झाल्याने शेतीचे उत्पादन वाढण्याबरोबरच जिल्हयाला कायम भेडसावणारी पाणी समस्याही कमी होणार असली तरी पावसाने यंदा रायगडला चांगलाच दणकाही लगावला  आहे.यंदाच्या पावसाळ्यात जिल्हयात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे सार्वजनिक व खासगी मालमत्ता मिळून 1 कोटी 41 लाख 128 कोटी रूपयांची हानी झाली आहे.या शिवाय सावित्री दुर्घटनेतील 40 जणांसह जिल्हयात विविध आपत्तीमुळे 78 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.यामध्ये रस्ते अपघातात 17,तळ्यात बुडून 3,ट्रेकिंग करताना 1,दरड अंगावर पडून1,पाण्यात बुडून 4,भिंत पडून 1,धरणात बुडून 2,समुद्रात पडून 1 विजेच्या धक्क्कयानं आणि अन्य कारणांनी  4 जणांचे बळी गेले आहेत.त्यापैकी 36 जणांच्या नातेवाईकांना सरकारतर्फे आर्थिक मदतही दिली गेली आहे.नैसर्गिक आपत्तीत 26 मोठी दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडली.अन्य 31 जनावरेही दगावली आहेत.या शिवाय 33 घरांचे नुकसान झाले.तर 119 गोठेही जमिनदोस्त झाले .या फटक्यामुळे यंदाचा पावसाळा रायगडकरांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणार हे नक्की. रायगड जिल्हयात यंदा सरासरी 4 हजार 184.61 मिलिमिटर पावसाची नोंद झाली  आहे. 
 रायगडात आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचे मोर्चे 
 मराठा क्रांती मोर्चाने राज्यातील सामाजिक वातावऱण ढवळून निघालेले असतानाच मुस्लीम समाजास नोकर्‍या आणि शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी रायगड जिल्हयात ठिकठिकाणी जमीयत अलेमा ए हिंद या संघटनेच्यावतीने मोर्चाचे आयोजन केले गेले होते.मुरूड,महाड,श्रीवर्धन,म्हसळयासह अलिबागेतील मुस्लिमांनी आरक्षणासाठी भव्य मोर्चे काढून सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला.मराठा समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही,पण मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यात पाच टक्के आरक्षण मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे.सरकारने या संदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर येत्या काही दिवसात संघटनेच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन कऱण्यात येईल असा इशाराही संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.सर्वत्र मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला.
 सर्वांनी एकत्र येऊन मोर्चे काढावेत ः नाना पाटेकरांचे मत
 जाती निहाय मोर्चे काढण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन मोर्चे काढून न्याय मागावा अशी सूचना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी रोहयातील एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.जाती-जाती वाढत असलेले अंतर कमी कऱण्याची गरज प्रतिपादन करतानाच नाना पाटेकर म्हणाले,माणूस ही सर्वात सोपी जात आहे.ती अधिक भक्कम झाली पाहिजे.आपल्या मूलभूत सुविधांसाठी मोर्चे काढावे लागत आहेत हे आपले अपयश असल्याचं मतही नानांनी व्यक्त केलं.नामच्या माध्यमातून झालेले काम आपल्या आजवरच्या सर्व पुरस्कारांपेक्षा मोठं असल्याचं समाधानही त्यानी व्यक्त केलं
  रायगड भूषण पुरस्काराचे वितरण 
 सामाजिक,राजकीय,आध्यात्मिक,क्रीडा,पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या जिल्हयातील काही व्यक्तींना रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.यावर्षी 84 मान्यवरांना रायगड भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले गेले.यावळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे,आमदार धैर्यशील पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर आदि यावेळ ीउपस्थित होते.निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यावर्षी चक्क 84 जणांना रायगड भूषण पुरस्कार दिला गेल्याचा आरोप जिल्हयात होत आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here