रायगड महोत्सवाची तयारी जोरात

0
844
सास्कृतिक कार्य मंत्रालयाच्यावतीनं 8 ते 12 जानेवारी दरम्यान रायगडावर संपन्न होत असलेल्या रायगड महोत्सवात जनतेला  सहभागी होता यावे यासाठी सास्कृतिक विभाग एक वेबसाईट सुरू करीत असून या वेबसाईटचा शुभारंभ 15 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.वेबसाईटच्या माध्यमातून सशुल्क नोंदणी करून रायगड महोत्सवात सहभागी होता येणार आहे.महोत्सव काळात रायगडावर 15 हजार आणि पाचाड येथे 25 हजार लोक थांबू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.जिजामाता राजवाड्याजवळ विविध सास्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत असून 8 जानेवारीला उद्दघाटन झाल्यानतर 9 ते 12 जानेवारी या कालावधीत शिवाजी महाराजाच्या आयुष्यातील विविध प्रसंग जिवंत करण्यात येणार आहेत.जिजामाता राजवाड्याजवळ राजमहल उभारण्यात येत असून या काळात सांस्कृतिक कार्यक्रम,नाटकांची रेलचेल असणार आहे.काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या महोत्सवातील तयारीचा आढावा घेण्यात आला.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here