रायगड बाजारमुळे अलिबाग नगरपालिकाच अडचणीत

0
1146
अलिबाग नगरपालिकेतील सर्व सदस्यांना अनहर्त करण्यात यावे अशी मागणी करणारी एक याचिका रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल झाली असून त्यावर 16 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.अलिबाग नगरपालिकेच्या 22 मे 2015 रोजी झालेल्या सर्वसाधाऱण सभेत नगरपालिकेच्या मालकीचा 1240 चौरस मीटरचा भूखंड  लीजवर      श्रीबाग सहकारी मध्यवर्ती ग्राहक मंडळ लिमिटेड या संस्थेला देण्याचा ठराव संमत केला होता.या जमिनीनीचे मुल्यांकन बाजार भावानुसार नसल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.त्यामुळे औद्योगिक नगर अधिनियम 1965 च्या कलम 308 अन्वये कारवाई करावी अशी मागणी याचिकाकर्ते सागर पाटील यांनी केल्याने अलिबाग नगरपालिका अडचणीत सापडली आहे.अलिबाग नगरपालिकेत शेकापची एकहाती सत्ता असून शेकापचे 17 नगरसेवक आङेत.16 डिसेबरला जिल्हाधिकारी काय र्निर्णय देतात याकडे आता संपूर्ण रायगडचे लक्ष लागले आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here