रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन म्हणजे स्नेहमेळावा असतो.वर्षभरात चांगलं काम केलेल्या पत्रकारांचं कौतूक,पुरस्कार नव्याच्या पाठीवर शाबासकीची थाप,ज्येष्ठांचे आशीर्वाद अशा कार्यक्रमांची या स्नेहमेळाव्यात रेलचेल असते.यंदा हा स्नेहमेळावा म्हसळ्यात पार पडला.रायगडचा भूगोल ज्यांना माहिती आहे त्यांना ठाऊक असेल की,म्हसळा हे आडमार्गावरचं,विकासापासून वंचित असं गाव आहे.तिथं जायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो.धड रस्ते नाहीत,कोणतीही सोय नाही.विकास म्हणजे काय याचाही पत्ता नाही.अशा या दुर्गम भागात जिल्हयातील पत्रकार एकत्र आले.आपल्या प्रश्नांवर चर्चा केली,सामाजिक बांधिलक कशी जपली पाहिजे हे सांगितलं गेलं,अध्यक्ष विजय मोकल यांनी पुढील वर्षाच्या कार्याची दिशा दाखविली.मागील वर्षाच्या कार्याचा आढाव सादर केला.तुडुंब भरलेल्या हॉलमध्ये टाळ्यांच्या कडकडाटात याचं स्वागत केलं गेलं.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी रायगड प्रेस क्लबच्या कार्याची मुक्त कंठानं प्रशंसा तर केलीच शिवाय पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे असे ठोसपणे सांगितले.राज्यातील अन्य संघटनांनी रायगड प्रेस क्लबच्या आदर्शवत कार्याचं अनुकरण केलं पाहिजे अशी सूचनाही त्यानी केली.आचार्य अत्रे यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार यंदा शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांना दिला गेला आहे.तसेच जिल्हयातील पत्रकारांनाही विविध पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आलं.श्रीवर्धन आणि म्हसळा प्रेस क्लबच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे चोख नियोजन केलं गेलं होतं.यावेळी एस.एम.देशमुख,किरण नाईक,नागेश कुलकर्णी,नरेद्र वाबळे,विजय मोकल आदिंची भाषणं झाली..-