अलिबाग- बॅंकिंग फ्रटीयर्सच्यावतीने देण्यात येणारे विविध गटातील पाच राष्ट्रीय पुरस्कार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेला मिळाले आहेत. एकाच वेळी पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी रायगड बॅंक ही देशातील पहिलीच बॅंक ठरली आहे. पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट व्यवस्थापनासाठीचे बेस्ट एनपीए मॅनेजमेंट,बेस्ट युथ कस्टमर क्विझीशन,आणि आय टी इनिशिएटीव्ह तसेच प्रदीप नाईक यांना बेस्ट सीइओ आणि मंदार वर्तक यांना बेस्ट आय़टी हेड या पुरस्कारांचा समावेश आहे..हैदराबाद येथे नुकतेच या पुरस्कारांचे वितरण कऱण्यात आले.या कार्यक्रमास रिझर्व्ह बॅंक,नाबार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर देशातील विविध बॅकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बॅंकिंग फ्रन्टियर्स ही देशातील सहकारी बॅकांमधील गुणवत्ता,उत्तम व्यवस्थापन तसेच आर्थिक प्रघतीच्या निकषांवर राष्ट्रीय पुरस्कार देणारी संस्था आहे.