फेब्रुवारी 2017 मध्ये होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठीचे अध्यक्षपद यंदा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने रायगड जिल्हा परिषदेची सूत्रे महिलेच्या हाती येणार हे स्पष्ट झाले आहे.रायगड जिल्हा परिषदेत सध्या शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे.जिल्हा परिषदेच्या 62 जागा असल्या तरी या जागांमध्ये लक्षणीय घट होत आहे.जिल्हयात नव्याने पाच नगरपंचायती झालेल्या आहेत.त्या परिसरातील 5 ते 7 सदस्य कमी होतील.शिवाय पनवेल महापालिकेत 68 गावे समाविष्ट झाल्याने तेथील पाच सदस्य कमी होतील .पनवेलचा हा परिसर शेकापचा तर म्हसळा,श्रीवर्धनचा टापू राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने या दोन्ही पक्षांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे.दरम्यान काल सोडत जाहीर झाल्यानंतर लगेच संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांचे नाव समोर आले आहे तर शेकापकडून चित्रा पाटील किंवा चित्रलेखा पाटील यांचे नाव समोर आले आहे.भाजप-शिवसेनेकडे तगडा उमेदवार नसल्याचे आज चित्र आहे.-