रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्प तब्बल 30 कोटींनी घटला
रायगड जिल्हा परिषदेच्या 2017-18 च्या अर्थसंकल्पात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 30 कोटीची घट झाल्याने याचा फटका रायगड जिल्हयाच्या विकासाला बसणार आहे.जिल्हा परिषदेला सर्वाधिक मुद्रांक शुल्क मिळवून देणार्या पनवेल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती पनवेल महापालिकेत विलीन झाल्याने जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसते.जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापतींची अद्याप निवड झालेली नसल्यानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी काल अर्थसंकल्प सादर केला.45 कोटी 31 लाख रूपयांचा हा अर्थसंकल्प असून त्यात चांगली काम करणार्यांना विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत.अर्थसंकल्पात घट झाली असली तरी त्यामुळं शिक्षण,आरोग्य,पाणीपुरवठा,कृषी आदिसाठी निधी कमी पडणार नसल्याचा विश्वास यावेळी नार्वेकर यांनी बोलून दाखविला.-