सप्टेंबर 29 ,2014 रोजी झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचा भंग केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे सदस्य महेंद्र दळवी आणि अॅड.राजीव साबळे यांना अपात्र ठरविणयात आले आहे.रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली उगले यांनी काल हा निर्णय दिला.दळवी आणि साबळे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा परिषदेवर निवडून आले होते.मात्र 29 सप्टेंबर 2014 रोजी झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारत महेंद्र दळवी यांनी शिवसेनेकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती तर राजीव साबळे यांनी पक्षादेश झुगारत शिवसेना उमेदवारास मतदान केले होते.त्यामुळे राष्ट्रवादीने महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियमानुसार साबळे आणि दळवी यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता.जिल्हाधिकार्यांनी काल त्याचा निर्णय दिला आहे.20 मार्च 2017 रोजी जिल्हा परिषदेची मुदत संपत आहे.-