भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 31 जानेवारी 2014 रोजी प्रसिध्द केलेल्या अंतिम मतदार यादीबाबत व लोकसभा निवडणूक 2014 च्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी प्रविण शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल,जिल्हा पुरवठा अधिकारी किरण पाणबुडे, उप जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी विश्वनाथ वेटकोळी, तसेच विविध खात्याचे अधिकारी,प्रतिनिधी आणि विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी श्री. भांगे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या असून प्राप्त दावे व हरकती नुसार 31 जानेवारी 2014 रोजी छायाचित्र मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी तसेच लोकसभा निवडणूक 2014 च्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन केले आहे. तसेच प्राप्त दावे व हरकती नुसार दिनांक 31 जानेवारी 2014 रोजी छायाचित्र मतदार यादीची अंतिम प्रसिध्दीची माहिती विधानसभा संघ निहाय पुढीलप्रमाणे आहे.