रायगड जिल्हयात पावसाचे थैमान

0
896
रायगड जिल्हयात पावसाचे थैमान,नद्यांना पूर,सावित्रीचे पाणी महाडमध्ये शिरले,पुल पडला,दरडी कोसळल्या ,एकाचा बळी 
रायगड जिल्हयाला आज दिवसभर पावसाने झोडपून काढले.सततच्या पावसाने रायगड जिल्हयातील सावित्री ,गांधारी,कुंडलिका,अंबा,पाताळगंगा,उल्हास,गाढी अशा सर्वच प्रमुख नद्यांना पूर आले असून सावित्री नदीचे पाणी महाड शहरातील अनेक सखल भागात शिरले आहे.गांधारी नदीचे पाणी महाड एमआयडीसी परिसरात पसरले असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.अंबा नदीचे पाणीही नागोठण्यात बस स्टॅन्ड परिसरात पसरले आहे.रोह्यात कुंडलिकाही दुथडी भरून वहात आहे.उद्या दुपारी बाराच्या सुमारास समुद्राला मोठे उधाण येणार आहे.उधाणाच्या काळात पाऊस कोसळत राहिला आणि नद्याचं पाणी उतरले नाही तर आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते .त्यामुळे नदी,खाडी काठावर राहणार्‍या तसेच समुद्र किनार्‍यावर राहणार्‍या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती यंत्रणा सज्ज आहे. दरम्यान दरडी कोसळण्याच्या,रस्ते खचण्याच्या तसेच पुल वाहून जाण्याच्या ़अनेक घटना जिल्हयात घडल्याने वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला.माणगाव-म्हसळा मार्गावर दरडी कोसळल्याने हा मार्ग बंद पडला आहे.म्हसळा वाशी मार्गावर वरळ येथील पूल पाण्याने वाहून गेल्याने म्हसळा-तळा या दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता बंद पडला आङे.म्हसळा मोर्बा रस्त्यावर दरड कोसळल्याने हा रस्ता देखील बंद पडला आहे.महाड नजिक सावित्रीचे पाणी मुंबई-गोवा महामार्गावर पसरल्याने हा महाार्ग देखील बंद पडण्याच्या स्थितीत आहे.पावासाने आज एकाचा बळी घेतला असून अलिबाग तालुक्यातील रामराज येथून एक इसम पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.
रायगड जिल्हयात आतापर्यंत सरासरी 2183 .37 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.आज जिल्हयात सरासरी 158.01 मिली मिटर पाऊस झाला.आज सर्वाधिक पाऊस कर्जतला 290 मिली मिटर एवढा झाला.
रायगड जिल्हयातील पावसाची ही छायाचित्रे.यात दरडी कोसळणे,पुल वाहून जाणे,रस्तायवर पाणी पसरणे आदि घटना घडल्याचे खालील छायाचित्रांवरून दिसत आहे.

5 Attachments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here