रायगडमध्ये दरड कोसळली

0
1003

रायगड जिल्हयात काल रात्रीपासून सर्वदूर पाऊस कोसळत असल्याने जिल्हयातील नद्या आणि नाले भरून वाहू लागले आहेत.गेलेे 24 तासापासून सलग कोसळत असलेल्या पावसाने मुंबई-गोवा महामार्गावरील वाकण-कोलाड दरम्यानच्या कशेळी खिंडित दरड कोसळल्याने महामार्गावरी वाहतूक  जवळपास दोन तास ठप्प झाली होती,ती सायंकाळी पूर्ववत करण्यात येंत्रणेला यश आले.

जिल्हयात सर्वत्र पाऊस कोसळत असला तरी किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक आहे.त्यामुळे अलिबाग.श्रीवर्धन,मुरूड,उरण या शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.अलिबागमध्ये सर्वाधिक 156 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.आज सर्वत्र समुद्र खवळलेला होता.मोठ्या लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या.
उद्या दुपारी 11 वाजून 57 मिनिटांनी पोर्णिमेची मोठी भरती आहे.या काळात 4.78 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने खाडी किनारच्या आणि नदी काठच्या रहिवाश्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीनं धोक्याचा इशारा देण्यात आला असून जनतेनं या काळात सावध राहावे असे सांगण्यात आले आहे.येत्या 24 तासात जिल्हयात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली गेली आहे.जिल्हयात सरासरी 78 मिली मिटर पाऊस झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here