रायगड जिल्हयातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आजपासून नामांकन पत्र भरण्यास सुरूवात होत असून उमेदवारांना 6 फेब्रुवारीपर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.रविवारी देखील नामांकन पत्रं स्वीकारली जाणार आहेत.रायगड जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी दुसर्या टप्प्पयात 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे.रायगड जिल्हयात 23 फेब्रुवारीपर्यंत आचारसंहिता असलण्याने 6 फेब्रवारीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकार्यांनी जाहीर केले आहे.पेड न्यूजच्या संदर्भात जिल्हात एक समिती गठित कऱण्यात आली आहे.