अलिबाग ( प्रतिनिधी ) रायगड जिल्हयातील पत्रकारांच्या पाठपुराव्यामुळे आता रायगड किल्ला सौर उर्जेच्या दिव्यांनी उजळून निघणार आहे.रायगड जिल्हयावर जिल्हा परिषदेच्यावतीनं सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकाशाची व्यवस्था कऱण्यात आली होती.मात्र ही सौर उर्जा यंत्रणा सहा महिन्यापासून बंद पडली होती.त्यातच 34,140 रूपयांची वीज बिलाची थकबाकी न भरल्यामुळं किल्ल्यावरील वीज तोडण्यात आली होती.त्यामुळं किल्ला अंधारात गेला होता.ही बातमी पनवेलचे एक सामाजिक कार्येकर्ते विष्णू गवळी यांना समजल्यानंतर त्यांनी स्वतःच्या खिश्यातून वीज बिलाची थकबाकी भरली होती.मात्र याबद्दल त्यांच्यावरच गुन्हा दाखल कऱण्याची तयारी यंत्रणेनं सुरू केली होती.अखेर विषय थेट राज्यपालांपर्यत गेला .राज्यपालांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन वीज पुरवठा सुरू कऱण्याची सूचना केली .त्यानुसार 28 ऑक्टोबर रोजी किल्लयावरील वीज पूर्ववत सुरू झाली.महाराष्ट्रात अनेक धऩदांडग्यांकडं वीज बिलाची थकबाकी असताना त्यंाची वीज तोडण्याचं धाडस न कऱणाऱ्या वितरण कंपनीने कोणाच्या आदेशावरून गडावरील वीज खंडित केली होती हे मात्र समोर आले नाही.राज्यपालांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात वीज मंडळाचे विल वेळच्या वेळी भरण्याची व्यवस्था कऱण्याचे सांगितले आहे. वीज मंडळाची वीज किल्लयावर सर्वत्र नाही.त्यामुळं वीज सुरू झाल्यावरही किल्ला अंधारातच होता.या स्थितीत रायगड प्रेस क्लबने किल्ल्यावर बैठक घेऊन किल्ला पुन्हा प्रकाशमान कऱण्याची मागणी केली होती.मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार,रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संतोष पेऱणे आदिंनी जिल्हाधिकारी सुमंत भागे याची भेट घेऊन किल्ल्यावरील वस्तुस्थिती त्यांच्या कानी घातली .त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या.पुरातत्व विभागाकडं संपर्क साधला गेला.अखेर पुरातत्व विभागानं किल्ल्यावरील बंद पडलेल्या सौर उर्जा प्रकल्पाची दुरूस्ती करण्याची परवानगी दिली असून तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच पाठविले आहे.त्यामुळं आता जिल्हा परिषदेमार्फत सौर उर्जा प्रकल्पाची दुरूस्ती होईल आणि किल्लया पुन्हा प्रकाशानं उजळून जाईल अशी अपेक्षा व्यक्ते केली जात आहे.रायगडमधील पत्रकारांनी आणखी एक महत्वाचा विषय हाती घेऊन त्यात यश मिळविले आहे,